शनिवार, २३ जुलै, २०१६

लोकमान्य टिळक जयंती

आज ज्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळक यांची जयंती !
गणपती व शिवजयंती सार्वजनिक स्वरुपात सुरु करून ज्यांनी इंग्रजांविरुद्ध जाहीर आंदोलनाचे पाउल  टाकले.
लोकांना एकत्रीत करून धर्म , संस्क्रती देशाभिमान शिकवला त्या महान विभूतीला वंदन.
आज आपण काय पाहतो तर प्रचंड कर्कश स्वरूपातील डॉल्बी , प्रचंड दनदनात करणारे ढोल आणि ताशे !
संपूर्ण परिसर प्रदूषणाच्या विळख्यात वेढन , या विभुती समोर अश्लील नाच करणारे उद्दाम .
आपण घातलेल्या एंका चं/गल्या प रंप रे चा हा काय प्रकार झाला असे तर   टिळकांना  वाटत असेल
एकत्रीत झालेल्या पैश्याचे गरीब गरजू लोकांना , विद्यार्थ्यांना , रुग्णांना , सहकार्य करणे . अश्या असंख्य सामाजिक , शैक्षणिक , क्रीडा , यासारख्या गोष्टीना मदत करता येयील का , असे विचार करणारा एखादा निपजावा हीच टिळकांचे जयंतीनिमित्त एक विचार प्रक्रिया ....
धन्यवाद.