सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

कॅप्शन जोडा

झगमगाट

आयर्विन पुलाचे खालून अशी काही रात्रीची रोषणाई तो झगमगाट दिसतो . मन अगदी प्रसंन्न होऊन जाते. कितीही वेळ तो झगमगाट पाहत राहिले तरी मन भरत नाही. नदीचा गारवा झुळझुळ वाहणारा वारा साथीला स्वामी समर्थ मंदिरातून येणारे पवित्र स्वर सगळाच साठवून ठेवावे असेच.
तीथुन आलो टी व्ही ओंन केला . कोण कोण काय काय बोलतंय आणि असे का बोलतंय . मला स्मृती इराणी कडून पदवी नको म्हणणारा , सर्व पातळ्या सोडून बोलणारे माजी जज्ज, दादरी प्रकरण चर्चेत राहावा यासाठी प्रयत्न करणारी मंडळी, राजकारणी मंडळी जणू काही ट्रीप काढायला मिळाल्यासारखे दादरीत घुसू पाहतात. कोण जे देशाच्या सीमेवर रोज कुरापती facebookकाढतात त्याचे पुस्तक प्रकाशन ठेवायचा हट्ट धरतात. तर कोण स्वत सत्तेत राहून सत्ताधारी न राहता विरोधाची भूमिका वटवू  पाहते  
प्रसिद्धी कोणाला नको असते . मग ती कोणत्याही मार्गाने मिळेना पण पाहिजे . त्यासाठी आपण काय करत आहोत . याचा विचार सोडून काहीही करायला तयार असणारी समाजात मंडळी असतात.
पूर्वी आपण विनोदी चित्रपट पहायला जात असू. पण आता मिडिया मुळे रोजच विनोदी प्रकार पाहायला मिळतात . त्यामुळे वैचारिक , सामाजिक असे भले मोठ्ठे शब्द कोण बोलू लागले की मस्त वेळ जातो . 
झगमगाटी साठी काहीही करू पाहणारी मंडळी यांनी पदवी परत केली काय आणि ठेवली काय . खरोखरच यांना काही करायचे असते तर नाना पाटेकर, आमटे कुटुंबीय, लोकांसाठी लढणाऱ्या मेधा पाटेकर,  यासारखे न बोलता काम करणारी मंडळी यांचा आदर्श ठेवून काही करून दाखवले असते. संपूर्ण देशाला सूर्य नमस्कार शिकवणारे रामदेवबाबा , स्वदेशी चा नुसता घोष न करता पतंजली निर्माण करून विश्वासहर्ता निर्माण करणारे रामदेवजीबाबा . अशा श्रेष्ठ व अधिकारी लोकांनी काही सूचना केली तर ठीक . पण कोनीही  न ओळखनाऱ्या या सरकारी वशिल्याने पदक प्राप्ती केलेल्या विद्वानांना कशाला एवढा भाव मिडिया देते तेच समजत नाही. 

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५

गणेश उत्सव ते दिवाळी 

भारतात प्रत्येक प्रांतात शहरात गावागावात जितके सौन्दर्य आहे . तेवढे जगात अन्यत्रच कुठतरी पाहायला मिळू शकते.
 पौराणिक काळापासून ते आजपर्यंत देशात विविध सण , कार्यक्रम १२ महिने सुरूच असतात.
हे सण का सुरु झाले . त्यावेळी नेमके काय करायचे असते. जेवणातील विविधता त्यात्या सणामध्ये वेगवेगळ्या प्रकारात कशासाठी असते. यांवर आपल्या घरातील वृद्ध मंडळी आपल्याला वेळोवेळी सांगत असतात. पुरणपोळी , गुळपोळी, सांजापोळी, खवापोळी तूप घालून स्वाद घेताना काय बोलावे. चकल्या, कुरवड्या, करंज्या, विविध चिवडे असे स्वाद जगात कुठेच दिसत नाहीत. या सणामागे त्यात्या ठराविक ऋतूत शरीराला आवशक असणारी गरज धरून त्यानिमित्ताने खाणे झालेने शरीर योग्य स्थितीत राहू शकते. यासाठी हे विविध सणसमारंभ.
आपल्या देशात आर्य ते आजपर्यंत अनेकांनी देशावर आपापली संस्कृती विविध मार्गांनी आणली.
या सण समारंभाचा वापर करून देशातील पारतंत्र्यात असलेल्या लोकांना उठाव करणेसाठी लोकमान्य टिळक, गांधीजी , वलाभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस , इत्यादि अनेक लोकांनी याचा वापर केला. पण स्वातंत्र्यानंतर मात्र उडानटप्पू, छचोर फक्त जाती जाती मध्ये वादविवाद वाढवणारे लोकांकडे सत्ता जास्त काळ ताब्यात गेली असलेमुळे या सणामुळे आनंद लोप पावत चालला आहे. किंबहुना पूर्वीचे नेते आज जिवंत असते तर त्याना रडु कोसळले असते. पैसे मिळवायसाठी गणेशोत्सव नवरात्र त्यासाठी मग गल्ली गल्लीबोळातील गुंडांनी लोकसेवा नावाखाली मंडळे काढून एक प्रकारचा धंदाच चालू केला. राजकारण करणाऱ्या मंडळीना सपोर्ट देवू म्हणत पोलिसांना गप्प करून हि मंडळे वेळकाळचे भान न ठेवता प्रचंड आवाजात डॉल्बीचा धिंगाणा घालत आहेत. आसपासचे परिसरातील जनता मुग गिळून घाबरून गप्प बसतात. बरे या नोंद असलेल्या गुन्हेगार मंडळीना पोलीस यंत्रणा परवानगी कसे देते हे काय सांगायला पाहिजे. सणाचा मूळ हेतूच संपून गेला आहे. पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे. 
पुन्हा निश्चितपणे बरी मंडळी राजकारणात येताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे , सुप्रिया सुळे , जयंत पाटील , राज ठाकरे हि प्रमुख राज कारणी मंडळी ज्याना त्यात्या पक्षात महत्वाचे स्थान आहे. आता फक्त मी महाराष्ट्र एवढेच लक्षात घेवून लिहित आहे. या मंडळीनी आपापले राजकारण करावे . पण वाईट प्रथा चुकीचे विचार दूर करणेसाठी एकत्रित प्रयत्नशील का बरे राहू नये. वाइटाला वाइट हि माणसे म्हणण्याची हीमत करू शकतात. 
यावेळी गणेशोत्सव थोडा चांगलाच झाला असे म्हणू शकू. पण सरकारसह समाजातील दबदबा असणारी लोक एकत्र येवून वाइट प्रथा बंद केल्यास हे सणाचा आनद लोकांना पुन्हा घेता येयील हे नवरात्री निमित्त. नवरात्रीच्या
शुभेच्या!