![]() |
| कॅप्शन जोडा |
झगमगाट
आयर्विन पुलाचे खालून अशी काही रात्रीची रोषणाई तो झगमगाट दिसतो . मन अगदी प्रसंन्न होऊन जाते. कितीही वेळ तो झगमगाट पाहत राहिले तरी मन भरत नाही. नदीचा गारवा झुळझुळ वाहणारा वारा साथीला स्वामी समर्थ मंदिरातून येणारे पवित्र स्वर सगळाच साठवून ठेवावे असेच.
तीथुन आलो टी व्ही ओंन केला . कोण कोण काय काय बोलतंय आणि असे का बोलतंय . मला स्मृती इराणी कडून पदवी नको म्हणणारा , सर्व पातळ्या सोडून बोलणारे माजी जज्ज, दादरी प्रकरण चर्चेत राहावा यासाठी प्रयत्न करणारी मंडळी, राजकारणी मंडळी जणू काही ट्रीप काढायला मिळाल्यासारखे दादरीत घुसू पाहतात. कोण जे देशाच्या सीमेवर रोज कुरापती facebookकाढतात त्याचे पुस्तक प्रकाशन ठेवायचा हट्ट धरतात. तर कोण स्वत सत्तेत राहून सत्ताधारी न राहता विरोधाची भूमिका वटवू पाहते
प्रसिद्धी कोणाला नको असते . मग ती कोणत्याही मार्गाने मिळेना पण पाहिजे . त्यासाठी आपण काय करत आहोत . याचा विचार सोडून काहीही करायला तयार असणारी समाजात मंडळी असतात.
पूर्वी आपण विनोदी चित्रपट पहायला जात असू. पण आता मिडिया मुळे रोजच विनोदी प्रकार पाहायला मिळतात . त्यामुळे वैचारिक , सामाजिक असे भले मोठ्ठे शब्द कोण बोलू लागले की मस्त वेळ जातो .
झगमगाटी साठी काहीही करू पाहणारी मंडळी यांनी पदवी परत केली काय आणि ठेवली काय . खरोखरच यांना काही करायचे असते तर नाना पाटेकर, आमटे कुटुंबीय, लोकांसाठी लढणाऱ्या मेधा पाटेकर, यासारखे न बोलता काम करणारी मंडळी यांचा आदर्श ठेवून काही करून दाखवले असते. संपूर्ण देशाला सूर्य नमस्कार शिकवणारे रामदेवबाबा , स्वदेशी चा नुसता घोष न करता पतंजली निर्माण करून विश्वासहर्ता निर्माण करणारे रामदेवजीबाबा . अशा श्रेष्ठ व अधिकारी लोकांनी काही सूचना केली तर ठीक . पण कोनीही न ओळखनाऱ्या या सरकारी वशिल्याने पदक प्राप्ती केलेल्या विद्वानांना कशाला एवढा भाव मिडिया देते तेच समजत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा